शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी भगवानपूर जि.प. शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: July 26, 2016 01:18 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत भगवानपूरवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शाळेला सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुलूप ठोकले.

दोन शिक्षक द्या : पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चार तासात शाळा सुरूकुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत भगवानपूरवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शाळेला सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुलूप ठोकले. मात्र पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चार तासात कुलूप उघडून शाळा सुरू करण्यात आली.भगवानपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग असून येथील विद्यार्थी पटसंख्या ७४ आहे. मात्र या सात वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी येथे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. गावकरी व पालकांनी पंचायत समिती प्रशासनाने या शाळेमध्ये आणखी दोन शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी अनेकदा केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या मुद्यावर सोमवारी संतप्त नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद पाडली. ग्रामस्थांनी कुलूप ठोकून शाळा बंद पाडल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाला मिळताच कुरखेडा पं.स.चे उपसभापती बबन बुध्दे, पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी, शिक्षण विस्तार अधिकारी वाघाडे यांनी तत्काळ भगवानपूर येथील शाळेला भेट दिली. संतप्त ग्रामस्थ व पालकांशी चर्चा करून कढोली जि.प. शाळेतील शिक्षक ए. बी. सायकार यांची सदर शाळेत तत्काळ नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय येत्या तीन दिवसात भगवानपूर जि.प. शाळेला एक शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर संतप्त पालकांनी आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)