शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अपंग आचलच्या यशाला शिक्षक भारतीची ‘शाब्बासकी’

By admin | Updated: June 17, 2015 02:35 IST

कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयातील दोन्ही हातांनी अपंग असलेल्या आचल राऊत

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयातील दोन्ही हातांनी अपंग असलेल्या आचल राऊत या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ७७.४० टक्के गुण मिळविले आहे. आचलच्या या यशाचे शिक्षक भारती संघटनेने पाच हजार रूपयांची भेट आचलला देऊन तिचे कौतुक केले.लोकमत कार्यालयात मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष एम. एन. चलाख, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनिल चौरासिया आचलचे वडील प्रदीप राऊत, आचल व धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डी. टी. कोहाडे, व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.या कौतुक सोहळ्यात बोलताना चलाख यांनी आचलच्या जिद्द व चिकाटी या गुणांचे कौतुक करून पायलचे यश सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. आचलच्या या यशाची गौरवगाथा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनाही आपण सांगितल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चलाख यांनी आपल्यातर्फे पाच हजार रूपयांचे धनादेश आचल व आचलचे वडील प्रदीप राऊत यांना सुपूर्द केला. भविष्यातही आवश्यक ते सहकार्य आचलला करू, असेही चलाख यांनी या कार्यक्रमात सांगितले. लोकमतमध्ये आचलच्या यशाची बातमी पहिल्यांदा वाचली व त्यातूनच तिला मदत करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच लोकमतच्या पुढाकारातून तिला भेट म्हणून पाच हजार रूपये देण्याचा निर्णय आपण घेतला, असेही चलाख यांनी यावेळी सांगितले. विज्ञान शाखेच्या शिक्षणातून करिअर घडविणार!४आचलची आई घाटी येथील शासकीय आश्रमशाळेत महिला अधीक्षक पदावर कार्यरत आहे. आचलने वर्ग १ ते ७ पर्यंतचे शिक्षण कोरची येथे आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. आठवी ते दहावीचे शिक्षण कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालय घाटी येथून पूर्ण केले व आता अकरावी विज्ञान शाखेत कुरखेडा येथील विद्याभारती महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. विज्ञान शाखेच्या शिक्षणातून करिअर घडविणार असे तिने यावेळी सांगितले.