शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना हलविले सुरक्षास्थळी

By संजय तिपाले | Updated: September 10, 2024 12:30 IST

जिल्ह्यात धो- धो: तीन राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प, अनेक गावांचा तुटला संपर्क

गडचिरोली: जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भामरागडमध्ये पुराचा जोर वाढला असून डॉ. आंबेडकर नगरातील २०० नागरिकांना १० सप्टेंबरच्या पहाटेपासून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, तीन राष्ट्रीय महामार्गासह अनेक छोटे नाले व  रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी दक्षिण गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  जिल्ह्यात रविवारपासून पावसाचे पुनरागमन झाले. सोमवारी दिवसभर रिपरिप सुरुच होती. रात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील नाले, नद्या तुडूंब भरुन वाहत आहेत. पर्लकोटा नदी , कुडकेली नाला , चंद्रा नाला व पेरमिली नाला पाण्याखाली गेल्याने आलापल्ली -भामरागड,निजामाबाद -सिरोंचा -जगदलपूर , कोरची- बोटेकसा हे महामार्ग बंद झाले आहेत. यासोबतच सिरोंचा तालुक्यातील मारीगुडम पोचमार्ग, देचलीपेठ- कोपला- सोमनपल्ली तसेच राजाराम - मरनेली या मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.  दरम्यान, भामरागडमध्ये पुराचा जोर वाढल्यानंतर २०० नागरिकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले. त्यांना जेवणाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.  दोन गंभीर रुग्णांना पुरातून नेले दवाखान्यातभामराडमध्ये १० सप्टेंबर रोजी दोन दोन गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून शीघ्र कृती दलाच्या मदतीने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

गोसेखुर्दचा विसर्ग वाढणारगोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच  पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासांत धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने ७ हजार ५०० ते ८००० क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल.   नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर