शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भामरागडचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झाली कसरत

By admin | Updated: June 26, 2015 00:13 IST

मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता.

भामरागड : मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता. परंतु विद्युत कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस केलेल्या परिश्रमामुळे वीज पुरवठा २४ जून रोजी सुरळीत करण्यात झाला. कांदोळी, गोफनफुली, तुरमगुंडा, उदेडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात २० जून पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाच दिवस कहर केला. तीन दिवसांत जवळपास ४७ मिली पाऊस झाला. एटापल्ली व भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या बांडिया नदीला पूर आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कांदोळी गावात वीज तारांवर चार झाडे पडली होती. तर भामरागड परिसरातील गोफनफुली गावात वीज तारांवर दोन झाडे पडली होती. तारांवर पडलेली संपूर्ण सहाही झाडे कापून वीज तारा मोकळ्या करण्यात आल्या. आपत्कालीन योजना म्हणून पडलेले खांब बायपास करून वीज तारांना ताणण्यात आले. तुमरगुंडा व उदेडा गावाजवळ वीज पडल्याने ७ पीन इंसुलेटर्सचे तुकडे झाले होते. विद्युत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर तुकडे शोधून ते बदलविण्यात आले. लाईनमन मंगाम व कंत्राटी कामगार साई यांनी पोहून नदीपात्रातील वीज वाहिन्यांवर अडकलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. तसेच लाईनमन धकाले यांनी भर पावसात वीजा कडाडत असताना देखील इंसुलेटर्सचे तुकडे शोधून काढले. एटापल्लीचे उपकार्यकारी अभियंता राजेश खडसे व कनिष्ठ अभियंता आर. बी. पोहणकर, जे. टी, सानप व इतर कर्मचाऱ्यांनी झाडाला दोरखंड बांधून दोराच्या सहाय्याने पाण्यात जाऊन बिघाड शोधून काढला व वीज तारा ओढल्या. उपकेंद्र ५० ते ६० किमी दूर असतांनाही तसेच या भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव व रस्त्यांची दुर्दशा असतांनाही वीज कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस परिश्रम घेत विद्युत पुरवठा सुरळीत केला. २४ जून रोजी दुपारी २ वाजता भामरागड येथील ३३ केव्ही लाईन चार्ज करण्यात आली. तसेच ११ केव्ही वाहिनी सुरू करण्यात आली. परंतु आलापल्ली येथील ६६ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्याने कार्यकारी अभियंता हिवरकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ११ केव्ही वाहिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.