शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात रक्तपेढी द्या!

By admin | Updated: February 9, 2017 01:38 IST

जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत.

उपसंचालकांकडे मागणी : सिकलसेलग्रस्तांना अनेकदा जाणवते अडचण भामरागड : जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत. या रूग्णांना नेहमीच रक्ताची आवश्यकता भासत असते. रूग्णांना अहेरी व गडचिरोली येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागते. परिणामी रूग्णांची गैरसोय होऊन प्रसंगी जीव गमवावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी भामरागड ग्रामीण रूग्णालयात रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी सांज संस्था व तालुक्यातील नागरिकांनी नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे. भामरागड येथील तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना सदर निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड ते अहेरी हे अंतर ७२ किमी असून रूग्णाला नेत असताना प्रवासात अनेक रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भामरागड येथे रक्तपेढी केंद्र देण्याची मागणी अनेकदा तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात आली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तालुक्यात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात अनेकजण रक्तदान करतात. ६ फेब्रुवारीला रक्तदान शिबिर घेऊन ३४ बॅग रक्त अहेरी येथे जमा करण्यात आले आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीत रक्त साठवण केंद्राकरिता खोलीही तयार करण्यात आली असून रक्त साठणव केंद्राकरिता आवश्यक असणारी उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु सदर उपकरणे धूळखात पडले असून रक्त साठवण केंद्र निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ भामरागड येथे रक्तपेढी केंद्र निर्माण करावे, अशी मागणी सांज माडिया संस्थेचे रूपलाल गोंगले, सचिव शहनाज व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)