भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आवाज बुलंद करीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल पासून संघर्ष यात्रा काढली. भामरागड तालुक्यातील हजारोच्या आदिवासी नागरिकांनी आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी अतिदुर्गम भागातून संघर्ष यात्रा काढली आहे.विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी नागरिकांनी २५ एप्रिलपासून संघर्ष यात्रा काढली आहे. सदर संघर्ष यात्रा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भामरागड तालुका मुख्यालयी पोहोचणार असून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. या संघर्ष यात्रेला भामरागड तहसील विकास कृती समिती, तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कमिटी, वनाधिकार समिती व ग्राम शिक्षण समितीने पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चेकरी आदिवासींच्या मागण्यागडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, बांबूतोड व विक्री ग्रामसभेच्या माध्यमातून व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी, केंद्र सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी विरोधी असल्याने सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, गोहत्या कायदा रद्द करण्यात यावा, भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासाठी नवी इमारत उभारण्यात यावी, तसेच या प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात यावे, आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.
भामरागडवासीयांची संघर्ष यात्रा
By admin | Updated: April 29, 2015 01:35 IST