शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्याचा विकास कागदावर

By admin | Updated: March 12, 2016 01:42 IST

भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत.

कर्मचाऱ्यांअभावी शहराचा विकास रखडला : न. पं. सभापतींचा शासनावर आरोपभामरागड : भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत. भामरागड तालुक्यात अनेक समस्या कायम असून या तालुक्याचा विकास केवळ कागदावरच आहे, असा आरोप नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरिदास रापेलीवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती देताना सभापती रापेलीवार म्हणाले, विकास करण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने तालुकास्तरावरील सर्व ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर केले. मात्र नगर पंचायतीच्या विकासात अनेक अडचणी कायम आहेत. भामरागड नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार परसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र अभियंता, लेखापाल, लिपीक, शिपाई व इतर पदे रिक्त आहेत. भामरागड नगर पंचायतीला विकासासाठी शासनाने १३७ लाख रूपयांचा निधी दिला आहे. मात्र या नगर पंचायतीत अभियंत्याचे पद रिक्त असल्याने सदर निधी कसा खर्च करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही रापेलीवार यावेळी म्हणाले.यापूर्वी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या तहसीलदारांनी एकूण निधीपैकी केवळ १५ ते २० लाख रूपये खर्च केले. मात्र या खर्चाचा हिशोब अद्यापही दिला नाही. नाली सफाईवर सदर निधी खर्च केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र हिशोब सादर न केल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भामरागड शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजना नादुरूस्त असून त्याच्या दुरूस्तीसाठी ४० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हातपंप दुरूस्ती व देखभालीची ७ लाख ७७ हजार रूपयांची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीची आहे. नगर पंचायत प्रशासन हातपंप दुरूस्त करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. नगर पंचायतीच्या विकासासाठी निधी दिला. मात्र नियोजन देण्यात आले नाही. विकासासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. मात्र नियुक्तीकडे शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोेप रापेलीवार यांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)