शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड-ताडगाव मार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:22 IST

भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे.

ठळक मुद्देखड्डे बुजविण्यासाठी टाकला मातीमिश्रीत मुरूम : डांबरी रस्ता ओळखणे झाले कठीण; वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून वाहनधारकांना या मातीचा त्रास आता पावसाळाभर सहन करावा लागणार आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर असलेल्या ताडगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ताडगाव भामरागडपासून १२ किमी अंतरावर आहे. भामरागड, आलापल्ली मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. ताडगाव येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदाराने चांगले मुरूम न टाकता माती मिश्रीत मुरूम टाकले. पावसामुळे व वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरूम बाहेर पडल्याने आता चिखल झाला आहे. संपूर्ण डांबरी रस्त्यावर चिखल पसरला आहे. चिखल वाहनाच्या टायरला चिपकत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. त्याचबरोबर सदर चिखल वाहनधारकावरही पडत असल्याने कपडे खराब होत आहेत. बांधकाम विभागाबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.इतरही रस्त्यांची दयनीय अवस्थाभामरागड तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. भामरागड तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. या तालुक्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याला कमी निधी दिला जातो. बांधकाम विभागाचीही तिच स्थिती आहे. निधीअभावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी झाली नाही. तर काही गावे अजूनपर्यंत रस्त्याने सुद्धा जोडण्यात आले नाही. रस्तेच नसल्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या गावापर्यंत पोहोचत नाही. गावातील नागरिकही कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. परिणामी भामरागड तालुक्याचा विकास रखडला आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग