शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

भामरागड अजूनही वनवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:30 PM

महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही.

ठळक मुद्देमूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही : २५ वर्ष उलटूनही आदिवासींचा संघर्ष कायम

रमेश मारगोनवार ।आॅनलाईन लोकमतभामरागड : महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही. परिणामी या भागातील नागरिक विविध समस्यांचा सामना करीत अडचणीचे जीणे जगत आहे. विशेष म्हणजे भामरागड तालुक्याच्या निर्मितीला आता २५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र या भागातील आदिवासी नागरिकांचा संघर्ष कायम असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्याची निर्मिती १९९२ मध्ये झाली. आता २०१८ ला तालुका निर्मितीला २५ वर्षे उलटले असून या तालुक्याची वाटचाल २६ व्या वर्षाकडे सुरू झाली आहे. मात्र विकासाचा वाटा विस्तारल्याचे दिसून येत नाही. भामरागड तालुक्यात माडीया आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने निसर्गाच्या सानिध्यात राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना नवे वर्षे येवो की जावो याचे काहीही सोयरसुतक नाही. एकीकडे शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. भारत देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मात्र दुसरीकडे महाराष्टÑातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर वसलेला भामरागड तालुका निर्मितीपासूनच विकासाच्या प्रतीक्षेत आहे.शासन दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करून दुर्गम भागातील जनतेपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यापैकी बºयाच योजनांची माहिती भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांना नसल्याने हे नागरिक शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी जनजागरण मेळावे घेण्यात आले. यात आदिवासी, पंचायत समिती, महसूल, शिक्षण, आरोग्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांनी या जनजागरण मेळाव्याकडे पाठ फिरविली. आदिवासी नागरिकांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आदिवासी समाजातील नेत्यांना भामरागडातील आदिवासींची दयनिय स्थिती दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आलापल्लीवरून भामरागडला येण्यासाठी रस्ता नाही. तालुका ठिकाणची पाणीपुरवठा योजना कागदावर आहे. भामरागड येथे एक कोटी रूपये खर्च करून उभारलेली पाणीटाकी व जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरली आहे. नगर पंचायतीचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. २०१८ या नव्या वर्षात भामरागड तालुक्यात विकासाचा महामेरू येईल काय, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.