साबांविचे दुर्लक्ष : अनेक वर्षांपासून दुरूस्ती नाहींलाहेरी : भामरागड तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असलेला लाहेरी या मुख्य मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. भामरागड तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेले कर्मचारी भामरागड येथे मुख्यालयी राहून दररोज ये-जा करतात. त्याचबरोबर तालुकास्थळ असल्याने भामरागड येथे हजारो नागरिक दरदिवशी प्रशासकीय कामासाठी जातात. लाहेरी परिसरातील ४२ गावे आहेत. या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदर मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. मार्ग दुरूस्तीबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले आहेत. मात्र बांधकामासाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने बांधकाम रखडले आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. (वार्ताहर)
भामरागड-लाहेरी मार्ग उखडला
By admin | Updated: September 12, 2015 01:23 IST