शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

बनावट खते, बियाणे विकाल तर खबरदार; 39 दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खते, बियाणे, कीटकनाशके विकताना शेतकऱ्यांची फसवणूक हाेऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत दुकानांची वेळाेवेळी तपासणी केली जाते. यावर्षीच्या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील २ हजार ३३ तपासण्या करून ९२२ नमुने घेण्यात आले. त्यात ३९ दुकानदारांचे नमुने अप्रमाणित निघाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त हाेताच संबंधित दुकानांची तपासणी केली जाते. 

२२ जणांवर खटले दाखल५ बियाणे विक्रेते, १३ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांवर कृषी विभागाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत तसेच १७ बियाणे विक्रेते, १८ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. नाेटीस नंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द हाेते.

एका दुकानाचा परवाना केला निलंबित-    कृषी विभागाने केलेल्या पाहणीत एका दुकानदाराच्या दुकानातील खत अप्रमाणित असल्याचे आढळून आले. संबंधित दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. -    कृषी विभाग वेळाेवेळी तपासण्या करीत असल्याने दुकानदार बाेगस बियाणे किंवा खते विकत नाही. मात्र शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे वसूल करतात. बियाण्यांच्या कंपन्यांनी जेवढी किंमत छापली आहे, त्यापेक्षा अधिक किमतीने बियाण्यांची विक्री करू नये, असा नियम आहे. मात्र कंपन्या दुकानदारांना जवळपास ५० टक्के मार्जिन देऊन किंमत लिहीतात. त्यामुळे बियाण्यांच्या किमतीत दुकाननिहाय फरक दिसून येते.

१३ लाखांचे बियाणे जप्त

अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचे बाेगस बियाणे पुरविले जात असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी दाेन ठिकाणी धाड टाकून बियाणे जप्त केले. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत १३ लाख ५८ हजार रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले.  महाराष्ट्रात काही कापुस बियाण्यांना प्रतिबंध घातला आहे, असे बियाणे विकल्या जातात.

 

टॅग्स :agricultureशेती