शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने रोवणीला वेग

By admin | Updated: July 4, 2016 01:05 IST

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

कमी मजुरीने शेतकऱ्यांना लाभ : १८ हजार हेक्टरवर होणार धानाची रोवणीवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाऊस असाच सुरू राहल्यास रोवणीच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चालू खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात १८ हजार २३० हेक्टरवर धानाचा पेरा आहे. सोयाबिनचे पीक १९ हेक्टरवर घेतले जाणार आहे. तसेच तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचेही लागवड केली जाते. मात्र यामध्ये मुख्य पीक धानाचे आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतकऱ्याने धानाचे पऱ्हे टाकले नव्हते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची वाट न बघता धानाचे पऱ्हे टाकले होते व ते आता रोवण्यायोग्य झाले होते. शेतकरी वर्ग केवळ पाऊस बरसण्याची वाट बघत होता. अशातच मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पऱ्हे टाकले होते. ते पऱ्हे सुध्दा पुढील आठ दिवसात रोवणीसाठी तयार होणार आहेत. त्यामुळे इतरही शेतकरी रोवणीला सुरूवात करतील. त्यामुळे पुढील आठ दिवसात रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग प्रसन्न आहे. जेवढे लवकर धानाची रोवणी होते. तेवढी उत्पादनात वाढ होते. हा दरवर्षीचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पाऊस लागताच रोवणीला सुरूवात केली जाते. सद्य:स्थितीत कमी प्रमाणात रोवणी सुरू आहे. त्यामुळे मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिकची मजुरीही द्यावी लागत नाही. दिवस मोठा असल्याने व रोवणीचे काम नुकतेच सुरूवात झाल्याने मजुरांमध्ये सुध्दा उत्साह आहे. त्यामुळे कमी मजुरीत अधिक काम होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. वैरागड परिसरातील काही शेतकऱ्यांकडे स्वत:च्या बोड्या आहेत. त्याचबरोबर मामा तलांवाचे पाणी सुध्दा दिले जाते. त्यामुळे वैरागड परिसरातील धान पीक पाण्याअभावी सहजासहजी करपत नाही. (वार्ताहर)शेतात गवत व पालापाचोळा तयार होतो. सदर पालापाचोळा चिखलणीच्या वेळी शेतातच गाळून टाकल्यास त्यापासून चांगले शेंद्रीय खत तयार होते. अनेक शेतकरी पालापाचोळा व धानाची तणीस जाळून टाकतात. तसे करण्याऐवजी ते जमिनीत मुरवावे, यामुळे सेंद्रीय खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.- ए. एल. कटरे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी