शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्कृष्ट आशांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:28 IST

समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून समाज परिवर्तनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा सन्मान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून समाज परिवर्तनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा सन्मान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात करण्यात आला.जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.भाऊराव वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमरदीप नंदेश्वर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अनुपम महेशगौरी, एल.आर.पोगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड येथील संजीवनी रेवनदास आठवले, द्वितीय पुरस्कार चामोर्शी तालुक्यातील आमगावच्या संगीता देवानंद कोहळे यांना देण्यात आला. विजेत्यांना अनुक्रमे आठ हजार व सहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांना तालुकानिहाय प्रथम पुरस्कार ४ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार २ हजार ५०० रुपये प्रदान करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रथम पुरस्कार एक हजार रुपये प्रमाणे ४७ पुरस्कार देण्यात आले. गटप्रवर्तकांना जिल्हास्तरीय तीन पुरस्कार देण्यात आले. यात प्रथम पुरस्कार १० हजार, द्वितीय पुरस्कार सहा हजार, तृतीय पुरस्कार चार हजार रुपये व प्रमाणपत्र असे स्वरूप होते. सदर पुरस्कार जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर व अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.माता व बाल मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आशांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करावी, असे आवाहन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली जोगदंडे तर आभार रचना फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.आरोग्यविषयक दोन मोहिमांचा शुभारंभजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मातृवंदना योजनेची व्यापक प्रसिद्धी होण्यासाठी शासनामार्फत सुपोषित जननी विकसित धारणी कार्यक्रम ८ ते २२ मार्च या कालावधीत राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी करण्यात आला.कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सामान्यत: कर्करोग तपासणी मोहीम ७ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत राबविली जात आहे. या मोहिमेचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमस्थळी उपस्थित आशा स्वयंसेविकांची मौखिक तपासणी दंत चिकित्सक डॉ.नंदू मेश्राम, डॉ.रिना मेश्राम यांनी केली. तसेच आशांना यावर मार्गदर्शन केले.