शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३०० जोडप्यांना ‘शुभमंगल’चा लाभ

By admin | Updated: August 8, 2015 01:28 IST

जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह ...

दोन वर्षांत : ३६ लाख वितरित; २०१४-१५ मध्ये १०० जोडप्यांचे प्रस्ताव सादरगडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या ३०० लाभार्थ्यांना १२ हजार रूपये प्रमाणे एकूण ३६ लाखांचे अनुदान दोन वर्षांच्या कालावधीत वितरित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. नागरिकांना आपल्या मुला, मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून विवाह सोहळा पार पाडावा लागतो. यातून अनेक मुलींचे वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. सर्वसामान्य पालकांनी लग्नसोहळ्याच्या कर्जामुळे आत्महत्या करू नये, नागरिकांच्या पैशाची बचत व्हावी, या हेतूने शासनाने शुभमंगल योजना कार्यान्वित केली आहे. सन २०१३-१४ या वर्षात विविध संस्थांमार्फत आयोजन करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या २०० जोडप्यांचे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. तसेच २०१४-१५ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या १०० जोडप्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर शासनाकडून मागणीनुसार मिळालेल्या निधीतून दोन्ही वर्षातील जोडप्यांना एकूण ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)लाभासाठी आवश्यक कागदपत्रेशुभमंगल योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत वर-वधूचा जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर-वधूने सक्षम प्राधिकरणासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, वधूचे आईवडील शेतकरी, शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या पालकांचे एक लाखांच्या आत उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचा दाखला, विवाह प्रथम असल्याचे तलाठी अथवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, वधूची आई नसल्यास वडीलांचे बँक खाते, ते ही नसल्यास वधूच्या बँक खात्याची झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.