शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:17 IST

नगर परिषद, नगर पंचायतमध्ये कार्यरत रोजंदारी, स्थायी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेत शनिवारी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देसेवेत कायम करा : गडचिरोली, देसाईगंज व आरमोरीत आंदोलन; अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद, नगर पंचायतमध्ये कार्यरत रोजंदारी, स्थायी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेत शनिवारी धरणे आंदोलन केले.सातवा वेतन आयोग लागू करावा, वर्ग ४ च्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दहावी, बारावीच्या शैक्षणिक अर्हतेवर पदोन्नती द्यावी, रजा रोखीकरण द्यावे, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, १९९३ पूर्वी स्थायी करण्यात आलेल्या रोजंदारी कामगारांना वारसा हक्क लागू करावा, त्यांना स्थायी करावे, नगर पंचायतीत रोजंदारी कामगारांचे समायोजन करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कामगारांना आवास योजनेसाठी २५ वर्षांची अट शिथील करावी, ठेका पध्दती बंद करावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातीलही सफाई कामगारांनी सहभाग घेतला.गडचिरोली नगर परिषदेत ज्ञानेश्वर सोरते, रितेश सोनवाने, गणेश ठाकरे, सुधाकर भरडकर, रोजंदारी कर्मचारी भिमराव जनबंधू, अशोक गेडाम, लक्ष्मी सिलेदार, गीता सिलेदार, राकेश सिलेदार आदींनी सहभाग घेतला. आरमोरी नगर परिषदेत अभियंता अविनाश बंडावार, लिपीक गिरीश बांते, अभियंता नितीन गोरखंड, बारापिंपळे, सुनिता शेंद्रे, हरीश शेंद्रे, सुधीर सेलोकर, भास्कर टिचकुले, पवन मोगरे यांनी सहभाग घेतला. देसाईगंज नगर परिषदेत कनिष्ठ लिपीक पेंदाम, अमित पठाण, मंगेश बोहरे, विनोद म्हरस्कोल्हे, मुकेश सोनेकर, नमिता मोगरे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगण महातो, सहसचिव सुभाष महानंदे, शहर अध्यक्ष प्रितम राणे, उपाध्यक्ष योगेश सोनवाने, ईश्वर महातो यांनी केले.कामबंद आंदोलनाचा इशारानगर परिषद व नगर पंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, यासाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने यापूर्वी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टप्प्या टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे. २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून आंदोलन केले जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगण महातो यांनी दिला आहे.