शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भोजनावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:55 IST

निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता.

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाºयांची भेट : चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. प्रकल्प अधिकाºयांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून जेवणावरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे.भामरागड येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहात आठवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे ३७ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहाला भोजन पुरवठा करण्यासाठी लॉर्ड बिरसा मुंडा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आला आहे. शासन प्रतिविद्यार्थी प्रतिमहा २ हजार ९९० रूपयांचे अनुदान संस्थेला देते. तरीही संस्था विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण देत आहे. तांदळाचा दर्जा अतिशय खराब आहे, असा आरोप करून जेवणावर बहिष्कार टाकला होता. मात्र मंगळवारपासून बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.वसतिगृह इमारतीतही अनेक समस्यावसतिगृहातील शौचालय चोकअप झाले आहेत. नगर पंचायततर्फे वसतिगृहासमोर हातपंप बसविण्यात आला आहे. मात्र सदर हातपंपाचे पाणी अशुद्ध आहे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे तुटले आहेत. संरक्षण भिंत नसल्यामुळे गावातील पाळीव जावरे, कुत्रे, डुकरे वसतिगृहाच्या परिसरात फिरत राहतात. खोल्यांमधील स्विच बोर्ड तुटले आहेत. पंखे व्यवस्थित नाही, अशीही तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.वसतिगृहाला भेट घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. कंत्राटदार व विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात आला आहे. कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बारीक व चांगल्या दर्जाच्या तांदळाचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बहिष्कार मागे घेतला आहे.- नीरज मोरे, प्रकल्प अधिकारी, भामरागडटेंडरमध्ये बारीकच तांदूळ पुरवावा, असे सक्तीचे नाही. मागील चार-पाच वर्षांपासून जे तांदूळ पुरविले जात होते त्याच दर्जाचे तांदूळ याही वर्षी उपलब्ध होते. मात्र विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने आता त्यांना त्यांच्या मर्जीनुसार बारीक तांदूळ उपलब्ध करून देण्यात येईल. टेंडरमध्ये ठरवून दिलेल्या मेन्यूनुसारच विद्यार्थ्यांना नाश्ता व जेवण दिले जाते.- कबीर शेख, भोजन कंत्राटदार, भामरागड