शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अहेरीत विकास कामांना सुरुवात

By admin | Updated: May 31, 2017 02:22 IST

अहेरी शहरात विविध प्रकारचे विकासकामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून तीन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

तीन कोटीतून होणार कामे : सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी शहरात विविध प्रकारचे विकासकामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून तीन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून अहेरी शहरात विविध प्रकारची विकासकामे सुरू झाली आहेत. या विकासकामांमुळे अहेरी शहराचे रूप पालटण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अहेरी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमॉस्ट लाईट लावण्यात आले. त्याच्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले आहेत. सदर कॅमेरे काही तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. मात्र लवकरच सदर कॅमेरेसुद्धा सुरू होतील, अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे. शहरात विविध ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम केले जात आहे. या कामांच्या दर्जावर पालकमंत्री, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. शहरात स्वच्छता राहावी यासाठी विशेष उपाययोजना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी अहेरी शहरातील नाल्यांचा उपसा करण्यासाठी नगर पंचायतीने नियोजन केले आहे. त्याचबरोबर कचराकुंडीमध्ये कचरा जास्त दिवस पडून राहणार नाही, याचेही निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच निधी उपलब्ध झाला नव्हता. प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर पूल झाल्यानंतर तेलंगणा व अहेरीतील दळणवळण वाढणार आहे. याचा फायदा अहेरी शहरातील नागरिकांना होणार आहे. अग्निशमन वाहन येणार अहेरी नगर पंचायतीला १५ दिवसांत अग्निशमन वाहन उपलब्ध होणार आहे. याचा लाभ अहेरी उपविभागातील शहरे व गावांना होणार आहे. अहेरी नगर पंचायतीला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी सातत्याने पाठपुरावा केला होता.