सदाशिव गिरमा घरत (५०), रा. सालमारा असे जखमी इसमाचे नाव आहे. सालमारा परिसरात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सदाशिव हा रविवारी सकाळी इतर मजुरांसाेबत तेंदूपत्त्याची पाने संकलन करण्यासाठी गेला हाेता. दरम्यान अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढविला. यात सदाशिव यांच्या डाेक्याला अस्वलाने ओरबडल्याने ताे गंभीर जखमी झाला. वनरक्षक जितेंद्र मडावी यांनी जखमी सदाशिवला दवाखान्यात भरती केले. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी के. एन. यादव करीत आहेत.
सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंतचा कालावधी वन्यप्राण्यांचा तलावातील पाणी पिऊन जंगलात भ्रमण करण्याचा राहते. जंगलात जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. जंगलामध्ये गेल्यानंतर समूहाने राहून एकमेकाशी संवाद साधत राहावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.