शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:54 IST

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रशांत ठाकरे यांचे आवाहन : माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा; गडचिरोलीत सायबर पोलीस स्टेशन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या ‘सायबर गुन्हेगारी जाणीव जागृती’ कार्यशाळेत ते बोलत होते. गडचिरोली येथील पोलिसांची सायबर लॅब आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.बँकेचे व्यवहार आॅनलाईन पध्दतीने करताना त्यात असणारी जोखीम, तसेच एटीएमचा वापर आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच दूरध्वनीवरुन बँक ग्राहकांची होणारी फसवणूक याबाबत ठाकरे यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाव्दारे सविस्तर विवेचन केले. व्हीशींग (टेलीफोनव्दारे फसविणे), फिशिंग (आॅनलाईन बनावट साईटव्दारे फसविणे), लॉटरी फ्रॉड, तसेच विवाहविषयक साईडव्दारे फसवणूक यापासून दूर कसे राहावे, याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. मोबाईल बँकींग करताना खुल्या वायफायच्या वापरात असणारे धोके नेमकेपणाने काय आहेत, त्याचप्रमाणे वन टाइम पिन आणि पासवर्डची सुरक्षितता याबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा व त्याबाबतच्या असणाºया महत्त्वाच्या तरतुदींबाबत पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सहकार्य या कार्यशाळेस लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दैठणकर यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.चार महिन्यांत सायबरचे केवळ दोन गुन्हेगडचिरोली सायबर लॅबच्या जोडीला आता सायबर पोलिस स्टेशनही सुरु झाले आहे. यात दाखल एका गुन्ह्यात शहरातील १३ जणांच्या एटीएमचा वापर करुन झालेली फसवणूक आणि त्या १५ लाख रुपयांच्या गुन्ह्यांचा घेतलेला तपास याचेही सादरीकरण राठोड यानी यावेळी केले. विशेष म्हणजे चार महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात केवळ दोन गुन्ह्याची नोंद झाली आहे.