शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हा

By admin | Updated: February 27, 2015 01:18 IST

विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा मागास असला तरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत स्वच्छ, निटनेटके आहे.

गडचिरोली : विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा मागास असला तरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत स्वच्छ, निटनेटके आहे. त्याचबरोबर येथील कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करून गडचिरोली जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवावे, असे आवाहन समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीदरम्यान महिला आरोग्य अभियान राबविणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. राणी बंग यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, डॉ. किशोर वाघ, डॉ. माळाकोळीकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, साथरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणी बंग यांनी महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. मात्र गरोदरपणात त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या कालावधीत महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात वंधत्वाची समस्या गंभीर आहे. याचा दोष मात्र महिलेवरच दिला जातो. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वंधत्व असलेल्या महिलेला समाजाचे टोमणे ऐकावे लागतात. गडचिरोली जिल्ह्यात गरीबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र आपली आरोग्य यंत्रणा अतिशय सतर्क आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी चांगली सेवा देत आहे. व्यसनाधिनता, कुपोषण याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, महिला पंधरवड्याचे यशस्वीरित्या आयोजन करावे, असे आवाहन डॉ. राणी बंग यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, रुग्णालयातील महिला रुग्ण उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. अनिल रूडे, संचालन डॉ. प्रवीण किलनाके तर आभार डॉ. रवी चौधरी यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)