शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानाच्या पाठीशी राहा

By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST

बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही.

गडचिरोली : बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही. ‘आम्ही भारताचे लोक’ या संविधानाच्या प्रास्ताविकेतच समानता भिनलेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात सुरू असलेले षड्:यंत्र हाणून पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहा, असे रोखठोक आवाहन सुविख्यात साहित्यीक तथा विचारवंत प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. सांप्रदायिकता विरोधी कृती समिती गडचिरोलीच्यावतीने येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालनात आयोजित जातीय अत्याचार व सांप्रदायिकता विरोधी परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनांचे जिल्हा संयोजक माजी आमदार हिरामन वरखडे होते. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जिंदा भगत, मुस्लीम परिषदेचे नेते प्रा. जावेद पाशा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान बिरसा मुंडा, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.पुढे बोलताना प्रा. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले,भारतीय संविधान हे मुल्यांचा व नैतिकतेचा कोष आहे. परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींवरच अलिकडे अन्याय व अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय नागरिकांनी आपल्या समस्यांच्या मुळाचा शोध घेतला पाहिजे, असेही प्रा. डॉ. मनोहर यावेळी म्हणाले.प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी म्हणाल्या, सांप्रदायिकता हे विकृतीचे नाव आहे. जातीय व धार्मिक भांडणाचा चौकटीतल्या लोकांना धोका नाही. मनुस्मृती ग्रंथात शुद्र व अतिशुद्रांना कठोर शिक्षा सांगितल्या आहेत. शुद्रांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. आता काही माणसाच्या मनात ‘मनू’ आहे. माणसाच्या मनामनातला हा मनू नष्ट झाला पाहिजे. तेव्हाच बहुजनांवरील अन्याय, अत्याचार नष्ट होतील, असेही प्रा. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश कोपुलवार, संचालन जगदश मेश्राम यांनी केले तर आभार प्रभू राजगडकर यांनी मानले. यावेळी रोहिदास राऊत, जि.प. सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, प्रा. पंडीत फुलझेले, नासीन जुमन शेख, सुरेखा बारसागडे, जगन जांभुळकर आदीसह बहुसंख्य दलित, आदिवासी व अन्य नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)