शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

२१ लाखांची मदत के व्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:10 IST

सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देतालुकास्तरावर दिरंगाई : जिल्हाभरातील अनेक आपदग्रस्त प्रतिक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात तालुकास्तरावरून आपदग्रस्तांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही २१ लाख २ हजार ३३५ रूपयांची मदत देणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.एप्रिल ते जुलैपर्यंत यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सहा इसमांचा मृत्यू झाला. यामध्ये कोरची तालुक्यातील एक व मुलचेरा तालुक्यातील पाच इसमांचा समावेश आहे. सदर मृतक इसमांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांप्रमाणे २४ लाख रूपयांची मदत प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.वीज पडून झालेल्या आपत्तीमुळे १८ इसम जखमी झाले. या १८ इसमांना एकूण १ लाख २ हजार ६०० रूपयांची मदत देण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, कोरची एक, देसाईगंज तीन, आरमोरी एक, चामोर्शी तीन, मुलचेरा सात, अहेरी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. आपत्तीमुळे यंदा ३० लहान जनावरे दगावली. यामुळे १ लाख २३ हजार रूपयांचे संबंधित पशुपालकांचे नुकसान झाले. यापैकी प्रशासनामार्फत २४ जनावर मालकांना १ लाख ५ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही सहा जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.आपत्तीमुळे ४५ मोठी जनावरे दगावली. यामुळे १० लाख १७ हजार रूपयांचे नुकसान झाले. यापैकी २४ जनावर मालकांना ५ लाख १४ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही २१ जनावरे मालक ५ लाख ३ हजार रूपये मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे जिल्हाभरात एकूण ५६९ घरांची अंशत: पडझड झाली. यामुळे १७ लाख ६९ हजार ५३२ रूपयांचे नुकसान झाले. यापैकी केवळ १०० आपदग्रस्तांना १ लाख ९२ हजार ४०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही ४६९ आपदग्रस्त १५ लाख ७७ हजार १३५ रूपयांच्या मदतीपासून वंचित आहेत.पावसामुळे दोन घरांची पूर्णत: पडझड झाली. यापैकी एकाला १८ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात आली.पावसामुळे सात गोठ्यांची अंशत: पडझड झाली असून १२ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाले. यापैकी पाच नुकसानग्रस्तांना ८ हजार २०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही दोन आपदग्रस्त ४ हजार २०० मदतीपासून प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निधी वळता करण्यात आला आहे. मात्र दिरंगाई तालुकास्तरावरून होत आहे.अतिवृष्टीने ५४ लाख रूपयांचे नुकसानयावर्षीच्या पावसाळ्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. १८ नागरिक जखमी झाले. ३० लहान जनावरे, ४५ मोठे जनावरे मृत्यमुखी पडली. ५६९ घरांचे अंशत: व दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले. सात गुरांचे गोठे कोसळले. या सर्व बाबीमुळे नागरिकांचे २४ लाख ४३ हजार ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले. आपदग्रस्तांना आतापर्यंत ३३ लाख ४० हजार ७०० रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. तर २१ लाख २ हजार रूपयांची मदत अजूनही देण्यात आली नाही. यामध्ये जनावर मालक व घर कोसळलेल्या नागरिकांचा समावेश आहे. सदर मदत तत्काळ देण्याची मागणी आहे.