शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कटिबद्ध होऊ या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:27 IST

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी अशोकचौधरी, प्रकल्प अधिकारी पठारे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी आ.कृष्णा गजबे म्हणाले की, गडचिरोली संवाद या चर्चासत्रात विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात सकारात्मक विचार मंथन होवून विकासाचा प्रारुप आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. त्यासोबत प्रशासनानी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी यांची स्वतंत्र बैठक बोलावून तेथील भौगोलिक, पारंपरिक परिस्थितीचा विचारविनीमय करुन एक आराखडा तयार केल्यास आपणास विकासाच्या योजना राबविण्यास निश्चित मदत होणार आहे. आजच्या स्थितीत शासकीय योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीचे समन्वय असून सर्व या विकास प्रक्रियेसाठी कटिबध्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.भारत सरकारच्या वन धन योजनेअंतर्गत ही एक संकल्पना समजून गौन वनउपज वनात राहणाऱ्या वनवासीना अधिक लाभाचे ठरेल अशी योजना आखावी. आणि कोणत्याही योजना कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत याव्यात अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केली. सर्व विभागांनी डेटा सादर करताना १०० टक्के सत्यतापूर्वक सादर केला पाहिजे. त्यामुळे आपणास पुढील योजनांची आखणी करताना चुका संभवणार नाही. दिलेल्या निर्देशांकाच्या व्यतिरिक्त गौण उपजावरील उद्योगावर भर दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्यामुळे वनावर आधारीत सर्व बांबीचासुध्दा यामध्ये समावेश करावा असे सामाजिक सेवा संस्थाच्या प्रतिनिधीकडून मत व्यक्त झाले आहे. याबाबीचासुध्दा आपणास विचार करावयाचा आहे. आतापर्यंत झालेल्या विचार मंथनातून निघालेल्या निष्कर्षाचा विचार केल्यास आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे. तेव्हा सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यास जिल्हा समृध्द करण्यास काही अडचणी येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.तत्पूर्वी शनिवारी झालेल्या संवाद सत्रातील विचार मंथनावर विचार विनिमय करण्यात आले. आणि गटनिहाय प्रश्न उत्तरांची नोंद टिपण्यात आली. या समोरोपीय कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराभाई हिरालाल, देवाजी तोफा, सृष्टी या संस्थेचे केशव गुरनूले, अहेरीचे अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, डॉ.प्रकाश पवार, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले तर, आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीcollectorजिल्हाधिकारी