शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे व खत विक्रीबाबत दक्ष राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:02 IST

खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या मागणी व पुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले. येत्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खते, कीटकनाशके व बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : खरीपाच्या नियोजनाचा आढावा, २.२२ लाख हेक्टरवर पेरणीचा लक्ष्यांक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला सुरूवात झाली आहे. लवकरच पेरणीलाही सुरूवात होणार असल्याने जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खते व बियाण्यांचा आढावा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी घेतला. बोगस बियाणे व खतांची विक्री होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष असले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.बैठकीदरम्यान येत्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या मागणी व पुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले. येत्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खते, कीटकनाशके व बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. चालू खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयामार्फत एकूण ५२ हजार ५०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर केले आहे. खरीप हंगामात टप्प्याटप्प्याने खत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथके तयार केली जाणार आहेत. तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली जाईल. निरिक्षकांकडून बोगस बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला महाबिज, विदर्भ, को ऑपरेटीव्ह फेडरेशन, कृषी निविष्ठा वितरक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हजर होते.खते व बियाणांचा तुटवडा नाहीकृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून लॉकडाऊनच्या कालावधीतही कृषी व कृषीवर आधारीत उद्योग सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत खते व बियाणांचा तुटवडा जाणवला नाही. आता बहुतांश उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यानही खते व बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.लागवडीचे लक्ष्यांकतालुका लक्ष्यांक (हेक्टर)गडचिरोली २२,९९५कुरखेडा १८,९४५आरमोरी २१,०४५चामोर्शी ४१,३२५सिरोंचा १६,६४५अहेरी १४,७४०एटापल्ली २०,५९०धानोरा २३,००५कोरची १२,२४०देसाईगंज ११,७९५मुलचेरा ९,५३५भामरागड ९,३४०एकूण २,२२,१००

टॅग्स :agricultureशेती