शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाचा योग्य उपयोग व्हावा

By admin | Updated: June 11, 2014 00:04 IST

शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक

तज्ज्ञांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण : उल्हास नरड यांचे आवाहनगडचिरोली : शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले.इयत्ता ३ रीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत तालुकास्तरीय तज्ज्ञांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण येथील कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी नरड बोलत होते.या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. रमतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. जी. चापले, संजय मेश्राम, प्रा. पाईकराव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यु. एन. राऊत, आर. व्ही. आकेवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी वडपल्लीवार, गौतम मेश्राम, लता चौधरी, संध्या चिलमवार, बोईनवार उपस्थित होते. पुढे बोलतांना शिक्षणाधिकारी नरड म्हणाले, जिल्ह्यातील एकही मुल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येकाला शिक्षण मिळणे हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करावे, शिक्षकांच्या व्यक्तीमत्वाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव पडतो. यामुळे शिक्षकांनी स्वत:चे व्यक्तीमत्व आदर्श ठेवायला हवे. तेव्हाच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुजाण भावी पिढी निर्माण होईल, असेही शिक्षणाधिकारी नरड यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौरे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यु. एन. राऊत, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार संध्या चिलमवार यांनी मानले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ९९, तालुकास्तरीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. याप्रसंगी गौतम मेश्राम, धनंजय चापले, रमतकर यांनीही मार्गदर्शन केले. घेतलेल्या प्रशिक्षणाचा विद्यादानाच्या कार्यात नक्कीच उपयोग होणार असून त्याची फलश्रुती हमखास मिळणार, असा विश्वास सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. (स्थानिक प्रतिनिधी)