शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१५६ गावांमध्ये होणार बेसिक बँक

By admin | Updated: January 24, 2017 01:54 IST

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती

अध्यक्षांची माहिती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम गडचिरोली : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विशेष उपक्रम हाती घेतला असून सुमारे १५६ गावांमध्ये बेसिक बँक स्थापन केली जाणार आहे. बँकेचा प्रतिनिधी संबंधित गावात जाऊन पैसे डिपॉझीट करणे, दुसऱ्या खात्यावर पाठविणे, रक्कम काढणे, शिल्लक रक्कमेची तपासणी करणे, मिनी स्टेटमेंट काढणे यासारखी कामे करणार आहे. त्यामुळे गाव तिथे बँक हे केंद्र सरकारचे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्ण करेल, असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १२० शाखा आहेत. म्हणजेच जवळपास ५०० गावांनाच बँकेचा लाभ मिळतो. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १६०० गावांपैकी सुमारे ११०० गावे आजही बँक सुविधेपासून वंचित आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. या अंतर्गत एकूण १५६ गावांमध्ये बेसीक बँक स्थापन केली जाणार आहे. ३१ मार्च पूर्वी किमान ५० गावांमध्ये बेसीक बँक स्थापन करण्याचे डीसीसी बँकेचे लक्ष्य आहे, अशी माहिती प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेला ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. सोमवारी बँकेच्या सभागृहात कॅशलेस प्रणालीचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेच्या एकूण ५५ शाखा आहेत. ४ लाख २६ हजार खातेदार बँकेशी जोडले आहेत. नाबॉर्डने बँकेला अ वर्ग दर्जा दिला आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बँकेकडे १ हजार १४२ कोटींच्या ठेवी, ६८४ कोटींची कर्ज बाकी आहे. एकूण व्यवसाय १ हजार ७८४ कोटी रूपये आहे. ३१ मार्च २०१६ ला बँकेचा नफा ९.५५ कोटी रूपये होता. नेट एनपीए शुन्य आहे. तर सीआरएआर २५.५१ टक्के एवढा आहे. मध्यवर्ती बँक युपीआय अ‍ॅप तयार करणार असून त्यामुळे मोबाईल बँकींग ग्राहकांना देणार आहे. पीओएस खरेदीची सुविधा देणार आहे. मार्च २०१७ पर्यंत बँकेचे सभासद व शेतकरी सभासदांना एक लाख रूपे एटीएम डेबीट कार्डचे वितरण केले जाईल. ग्राहकांना एसएमएस सुविधा, आरटीजीएस, एनव्हीएफटी, पासबूक प्रिंटींग मशीन, आधारलेस पेमेंट प्रणाली आदी सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, व्यवस्थापक अरूण निंबेकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) २१० गावांमध्ये कॅशलेसबाबत मार्गदर्शन ४केंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. कॅशलेस व्यवहारांची माहिती नागरिकांना कळावी, त्याचे फायदे लक्षात यावे, यासाठी बँकेने नाबार्डच्या सहकाऱ्याने २१० गावांमध्ये डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमाचा लाभ २३ हजार नागरिकांनी घेतला आहे. ४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१५-१६ चा राज्यस्तरीय ‘कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण १० फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई येथे होणार आहे. सदर पुरस्कार राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे.