शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लहान व्यावसायिकांना बँकेचे बळ

By admin | Updated: October 9, 2016 01:41 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संयुक्त देयता गट ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ...

संयुक्त देयता गट : २ कोटी ६३ लाखांचे कर्ज उपलब्ध; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकारगडचिरोेली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संयुक्त देयता गट ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत २८० संयुक्त देयता गट स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी १३६ देयता गटाच्या ८०० पेक्षा अधिक सदस्यांना २ कोटी ६३ लाख ३५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर कर्ज कोणतेही तारण न घेता वितरित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक लहान-मोठे व्यावसायिक आहेत. हा व्यवसाय पुढे वाढविण्यासाठी कर्जाची गरज भासते किंवा व्यवसायातील चढ-उतारादरम्यानही पैसा जवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न मर्यादित राहत असल्याने बचतही नगण्य आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आर्थिक अडचण निर्माण झाल्यास संबंधित व्यवसायिक अडचणीत येतो. अशा वेळेवर संबंधिताला कर्ज उपलब्ध व्हावे, त्याचबरोबर बचतीची सवय लागावी, या उद्देशाने व्यावसायिकांचे संयुक्त देयता गट स्थापन करण्याची परवानगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डकडे मागितली होती. नाबार्डने बँकेला ४०० गट स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात व्यावसायिकांचे गट स्थापन केले. गटामध्ये लहान व्यवसाय करणाऱ्या ५ ते १० पर्यंत व्यावसायिकांचा समावेश आहे. या योजनेमध्ये कर्ज जरी व्यक्तीकरित्या दिले जात असले तरी ते देयता गटाच्या माध्यमातूनच दिले जाते. आजपर्यंत बँकेने सुमारे २८० देयता गट स्थापन केले असून या गटांमध्ये जवळपास दोेन हजार व्यावसायिकांचा समावेश आहे. यापैकी १३६ गटांना २ कोटी ६३ लाख ३५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. सदर कर्ज जवळपास ८०० व्यावसायिकांना वितरित केले आहे. देयता गट स्थापन करण्यात आल्यामुळे कर्ज फेडण्याची जबाबदारी ही सामूहिक स्वरूपाची बनते. याच उद्देशाने सदर देयता गट स्थापन करण्यात येऊन त्यांना कोणतेही तारण न घेता कर्जाचे वितरण केले जात आहे. गडचिरोली शहरात २०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. देयता गटाला १ ते ३ लाख रूपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्ज फेड झाल्यानंतर आणखी नव्याने कर्जाचे वितरण केले जाते. त्यामुळे सदर योजना लहान व्यावसायिकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावित आहे. (शहर प्रतिनिधी)अडचणीच्या वेळी संयुक्त देयता गटाची मदतसलून व्यवसाय, किराणा दुकान, चिकन सेंटर यासारख्या लहान व्यावसायिकांची पत बँकेसमोर अत्यंत कमी आहे. त्यामुळे बँका या व्यावसायिकांना कर्ज देण्यास तयार होत नाही. बँका कर्ज देण्यास तयार झाल्या तरी तारण असणे आवश्यक आहे. मात्र संयुक्त देयता गटामध्ये सहभागी नागरिकांना कोणतेही तारण न देता कर्ज उपलब्ध होते. व्यवसाय करताना अनेक चढ-उतार येतात. यावेळी सदर देयता गटातील सदस्याला सहजपणे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे अशा प्रकारचे देयता गट स्थापन करून कर्ज घेण्याकडे व्यावसायिकांचा ओढा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सामूहिक जबाबदारी राहत असल्याने कर्ज बुडण्याचीही शक्यता कमी राहते. परिणामी बँकही या गटांना कर्ज उपलब्ध करून देत आहे.