शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वनांवर आधारित लघुउद्योगांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा

By admin | Updated: January 5, 2016 01:43 IST

वन आणि वनवासी हेच या जिल्ह्यातील दोन मोठे भांडवल आहेत आणि या दोन भांडवलातच जिल्ह्याच्या आर्थिक

गडचिरोली : वन आणि वनवासी हेच या जिल्ह्यातील दोन मोठे भांडवल आहेत आणि या दोन भांडवलातच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची बिजे दडलेली आहेत. म्हणून वनावर आधारित लघु उद्योगांना बँकांनी कर्ज पुरवठा केल्यास बँकांचाही फायदा होईल व जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॉ. दुर्वेश भोयर, मुरलीधर झंजाळ, जागोबा खेलकर, संचालिका मीरा नाकाडे, शशिकला देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बंग यांनी सरकारशाही व भांडवलशाही पब्लिक सेक्टर व प्रायव्हेट सेक्टर या दोन प्रकारच्या यंत्रणा देशात कार्यरत आहेत. परंतु सरकारशाहीत कार्यक्षमतेचा अभाव व भांडवलशाहीत भ्रष्टाचार, अनैतिकता मोठ्या प्रमाणावर उघडकीस आलेली आहे. या दोघांचाही सुवर्णमध्य म्हणजे सहकार क्षेत्र. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही विज्ञान व तंत्रज्ञानाने अद्यावत अशी बँक असून एक सहकारी बँक म्हणून ज्या अपेक्षा असतात, त्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यात बँक यशस्वी झालेली आहे. या यशात बँकेच्या तरूण नेतृत्वाचा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य उत्कृष्ट असून त्यांचीच पावती म्हणजे हे पुरस्कार होत. तंबाखू, दारू सोडा, धन आरोग्य जोडा असा संदेश याप्रसंगी डॉ. अभय बंग यांनी दिला. बँकेच्या ५४ शाखांच्या माध्यमातून हा संदेश चार लाख ग्राहकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या विकासात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या बँकेच्या नेतृत्वाचा जेव्हा सन्मान होतो, तेव्हा या संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान होत असतो. आपल्या सर्वांची ओळख ही बँक आहे. ही ओळख, ही प्रतिष्ठा भविष्यात अशीच कायम राहावी, यासाठी मी सदैव कटीबध्द असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर संचालन व आभार व्यवस्थापक अरूण निंबेकार यांनी केले. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सेवानिवृत्तांचाही सत्कार४२०१५ या वर्षात बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले रामभाऊ डोईजड, प्रभूदास कान्हेकर, सुधाकर पाल, प्रभाकर शेंडे, सावजी उंदीरवाडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ४शहरी भागातील शाखा गडचिरोली (शहर), मुख्य कार्यालय गडचिरोली, अहेरी येथील बँक शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील कनेरी, कोरेगाव, मार्कंडादेव व अतिदुर्गम भागातील कोटगुल, मानापूर, पोटेगाव या शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.