आरमोरी : सामान्य व्यक्तीच्या बचतीचे पैसे सुरक्षित ठेवण्याबरोबच व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल बँकेमुळेच उभारणे शक्य होते. नागरी सहकारी बँकेचे कार्यही कौतूकास पात्र आहे. या बँकेचा जिल्ह्यातील सामान्य व्यक्तीच्या विकासात मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले. दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था आरमोरीच्यावतीने सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल म्हशाखेत्री होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मोरोतराव कोवासे, भाग्यवान खोब्रागडे, सुधीर भातकुलकर, किशोर वनमाळी, सुमती मुनघाटे, माजी प्राचार्य खुशालराव वाघरे, देवराव खेवले, पी. टी. पुडके, एम. जे. कोटगले, डी. के. उरकुडे, एस. एन. येलेकर, डी. वाय. खेवले, एम. पी. म्हशाखेत्री, पी. जी. चिलबुले, के. के. मडावी, व्यवस्थापक एम. एल. मोरांडे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डी. एन. चापले, दादाजी चुधरी, पुरूषोत्तम खेवले, श्रीहरी कोपुलवार, मुकेश वाघाडे, अमिन लालानी, मिलिंद उमरे, पांडुरंग नागापूरे, विनायक बांदूरकर, एम. टी. नवघडे, रत्नदीप म्हशाखेत्री, महेंद्र खेवले यांच्यासह आरमोरी परिसरातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात जिवघेणी स्पर्धा असतानाही नागरी सहकारी बँक नफ्यात असून ग्राहकांना चांगली सेवा देत आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस या बँकांकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संचालन उरकुडे तर आभार प्रा. येलेकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
सामान्य व्यक्तीच्या विकासात बँकांचा मोलाचा वाटा
By admin | Updated: October 14, 2014 23:19 IST