शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन तास उशिरा उघडली बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:55 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवार १४ मे रोजी बँक तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली.

ठळक मुद्देएसबीआयचा भोंगळ कारभार : एटापल्लीत कर्मचाऱ्यांअभावी खातेदारांचे प्रचंड हाल

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवार १४ मे रोजी बँक तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच आर्थिक व्यवहार करण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या खातेदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, येथील रिक्त पदे भरण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त असलेली पदे तत्काळ भरावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु आठ ते दहा दिवसांचा कालावधी उलटूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. रिक्त पदे भरण्यासंदर्भात मागणी करूनही तसेच अनेक तक्रारी करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी एटापल्लीसह ग्रामीण भागातून अनेक खातेदार आले होते. परंतु कर्मचाºयांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली.बँकेत १ फिल्ड आॅफिसर, १ सर्व्हीस मॅनेजर, २ कस्टमर असिस्टंट व १ सुरक्षा कर्मचाºयाची आवश्यकता आहे. सदर रिक्त पदे भरावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये रोष आहे.जनरेटरचाही अभावएटापल्ली येथील बँकेत जनरेटरचा अभाव आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास बँकेचे व्यवहार बंद पडतात. त्यामुळे कामाकाजावर परिणाम होतो. शिवाय येथील एटीएमही बंद अवस्थेत आहेत. तालुक्याची व्याप्ती लक्षा घेऊन २०१८ मध्ये जारावंडी व गट्टा येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. परंतु सदर केंद्र सहा महिन्यांपासून बंद असल्याने एटापल्ली येथे खातेदारांची गर्दी वाढली आहे. जारावंडी व गट्टा तसेच कसनसूर येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू केल्यास नागरिकांची गर्दी कमी होईल व त्यांचे कामही लवकर होईल. एटापल्ली येथे तीन सीएसपी केंद्र सुरू करण्यात आले. त्यापैैकी एक बंद आहे. तसेच जुन्याच इमारतीतून बँकेचे कामकाज सुरू आहे.