शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांअभावी एटापल्लीतील बँक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:50 IST

स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही.

ठळक मुद्देस्टेट बँकेतील प्रकार : शाखा व्यवस्थापकाने बँकेच्या मुख्य दरवाजाला लावले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही. सोमवारी कार्यरत कर्मचाºयांपैैकी दोन कर्मचारी सुटीवर तर एक कर्मचारी रोकड आणायसाठी गेले. कॅश कॉऊंटरवर एकही कर्मचारी नसल्याने अखेर शाखा व्यवस्थापक योगेश दत्त यांनी चक्क बँकेचा मुख्य दरवाजाला कुलूप लावले. बँक बंद असल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.दुपारच्या सुमारास नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती जितेंद्र टिकले व बांधकाम सभापती किसन हिचामी यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकासोबत चर्चा केली. त्यानंतर बँक उघडण्यात आली. मात्र बँकेच्या दरवाजाला कुलूप असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत या बँक शाखेतील आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प होते. २५ मे १९७८ मध्ये तालुक्यात कुठलीही बँक नसताना एटापल्ली येथे स्टेट बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा सुरू करण्यात आली. सदर राष्ट्रीयकृत बँक शाखेला आजघडीस ४० हून अधिक वर्ष उलटले आहेत. एटापल्ली तालुक्यात ही बँक शाखा वगळता इतर कोणतीही दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. सदर बँकेचे २५ हजारवर खातेदार असून दररोज ४० ते ५० लाख रूपयांची उलाढाल होत असते. तसेच ५५ कोटी पेक्षा अधिक रक्कम या बँक शाखेत खातेदारांची जमा आहे. येथील कार्यरत कर्मचारी प्रामाणिक सेवा देत आहेत. मात्र रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचारीही हतबल झाले आहेत.या बँक शाखेतील विविध समस्यांची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार दिल्या जाते. परंतु एकही समस्या मार्गी लावली जात नसल्याची खंडत येथील शाखा व्यवस्थापकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. प्रस्तूत प्रतिनिधीने याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व ठाणेदार जगताप यांना दिली. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करू, असे सांगितले. बँक बंद असल्याने ग्राहकांना फटका बसला.