शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बंडोपंत मल्लेलवार यांचे जि.प. सदस्यत्व रद्द

By admin | Updated: November 26, 2014 23:05 IST

नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याच्या आरोपावरून वर्षभरापासून नागपूरच्या कारागृहात असलेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार हे सलग वर्षभर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण

गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याच्या आरोपावरून वर्षभरापासून नागपूरच्या कारागृहात असलेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार हे सलग वर्षभर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष सभांना विनापरवानगीने गैरहजर राहिल्याने त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व विभगीय आयुक्तांनी रद्द केले आहे़नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याप्रकरणी भामरागड पोलिसांनी २१ जून २०१३ रोजी बंडोपंत मल्लेलवार यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते़ त्यावेळी या प्रकरणातील चार जणांना पोलिसांनी अटक केली होती, तर एकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता़ मात्र, बंडोपंत मल्लेलवार यांनी काही कालावधीसाठी फरार झाल्यानंतर ७ आॅगस्ट २०१३ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ तेव्हापासून ते नागपूरच्या कारागृहात आहेत़ मल्लेलवार हे मौशीखांब-मुरमाडी गट क्रमांक-२० या जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात़ परंतु ८ जुलै २०१३ पासूनच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांना, ३० मे २०१३ पासूनच्या स्थायी समितीच्या सभांना व ३१ मे २०१३ पासून आरोग्य समितीच्या सभांना ते विनापरवानगीने गैरहजर राहिले़ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ८२(२)अन्वये एखादा सदस्य जिल्हा परिषदेच्या सभांना सहा महिने किंवा वर्षभर अनुपस्थित राहिल्यास तसेच विषय समित्यांच्या सभाना ३ महिने किंवा सहा महिने अनुपस्थित राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते़ त्याअनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ४०(१) (ब) अन्वये मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची जागा रिकामी झाली किंवा कसे, याबाबत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना ११ जून २०१४ रोजी पत्र लिहिले होते़या पत्राच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी ६ सप्टेंबर, २२ सप्टेंबर व २० आॅक्टोबर अशा तीन वेळा सुनावणी केली़ पहिल्या दोन तारखांना बंडोपंत मल्लेलवार यांच्या वतीने त्यांचे पुत्र राहुल मल्लेलवार उपस्थित होते़ त्यानंतरच्या सुनावणीला अ‍ॅड. कुणाल मुल्लमवार यांनी मल्लेलवार यांच्या वतीने काम पाहिले़ अ‍ॅड. मुल्लमवार यांनी मुदतवाढ मागून २९ आॅक्टोबरला लेखी निवेदन दिले़ त्यावर विभागीय आयुक्तांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी अंतिम निर्णय देऊन बंडोपंत मल्लेलवार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केले आहे़ विभागीय आयुक्तांचा हा निर्णय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्तांना कळविला आहे़ आता लवकरच निवडणूक विभाग मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी पोटनिवडणूक घेईल, असे सांगितले जात आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)