शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:33 IST

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसह विराधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देबाजारपेठ ठप्प : काँग्रेस व राष्ट्रवादीची मोटारसायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसह विराधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून बाजारपेठ बंद होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने भंडारा शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील पवनी, साकोली, मोहाडी आदी तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला.भंडारा शहरात बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तत्पूर्वी माजी खासदार नाना पटोले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता शहरातील विविध मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डोक्यावर काळी पट्टी बांधून हातात झेंडे घेवून सहभागी झाले होते. गांधी चौकातून नारे देत निघालेली ही रॅली राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, त्रिमुर्ती चौक मार्गे बसस्थानक परिसरात पोहोचली. मार्गातील व्यापारी प्रतिष्ठांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.यावेळी माजी खासदार नाना पटोले म्हणाले उद्योगपतींना फायदा मिळावा अशी निती केंद्र सरकार तयार करीत आहेत, पंरतु सरकारला त्याची चिंता नाही.केंद्र सरकारविरोधात जनतेत आक्रोश असून त्याचाच परिणाम म्हणजे भंडारा बंदला प्रतिसाद होय, असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, आनंदराव वंजारी, बंडू सावरबांधे, सेवक वाघाये, जिया पटेल, अनिल बावनकर, अभिषेक कारेमोरे, माधव बांते, हिवराज उके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.साकोलीत कडकडीत बंदसाकोली : देशव्यापी बंद अंतर्गत साकोली येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. शहर काँग्रेस कमेटी व राष्ट्रवादीच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत पंतप्रधानाना निवेदन पाठविण्यात आले. दरवाढ रोखली नाही तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होमराज कापगते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंगराज समरीत, सुरेशसिंग बघेल, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, विजय कापगते उपस्थित होते.पवनी येथे शंभर टक्के बंदपवनी : काँग्रेस व मित्र पक्षाच्या आवाहानाला प्रतिसाद देत पवनी येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येथील गांधी चौकात एकत्र आले. त्यांनी बंदचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास राऊत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, डॉ. विजय ठक्कर, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदुरकर, मोहन पंचभाई, शैलेश मयुर, नगर परिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, यादवराव भोगे, नगरसेवक सानु बेग, डॉ. विकास बावनकुळे, शशि भोगे, अनिल धारगावे, राष्टÑवादीचे सुनंदा मुंडले, लोमेश वैद्य उपस्थित होते.मोहाडीत उत्तम प्रतिसादमोहाडी : देशव्यापी बंदला मोहाडी येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील दुकाने कडकडीत बंद होती. राष्ट्रवादीचे विजय पारधी, ज्ञानेद्र आगाशे, किशोर पात्रे, लिलाधर धार्मिक, मदन गडरिये, अफ्रोज पठाण, गोपींचद टाले, आकाश निमकर, मंगेश हटवार, भुषण कुंभारे, दुर्गेश मोटघरे यांनी बंदसाठी परिश्रम घेतले.एसटी महामंडळाच्या १५२ बसफेऱ्या रद्दभारत बंद आणि पाळवा सणामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातील १८१ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. बंद दरम्यान कुठेही बसेसची तोडफोड झाली नाही. भंडारा, गोंदिया, तिरोडा, पवनी, तुमसर, साकोली या आगारातून ३३३ बसफेºया नियोजित होत्या. मात्र सोमवारी १५२ बसफेºया झाल्यात. सर्वच फेऱ्या भारत बंद आंदोलनामुळे नव्हे तर पाडवा सणामुळे प्रवाशी संख्या कमी असल्याने रद्द झाल्याचे महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले.पाडव्यामुळे सर्वसामान्यांवर बंदचा परिणाम नाहीभारत बंद अंतर्गत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असली तरी पाडवा सणांमुळे सर्व सामान्यांवर या बंद चा कोणताही परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी तुरळक दुकाने उघडी दिसत होती. तर दुपारी २ वाजेनंतर शहरातील पेट्रोलपंप सुरु करण्यात आले.