शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:48 IST

नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले.

ठळक मुद्देअंजली राजपूत यांचे प्रतिपादन : ताडगाव येथे जनजागरण मेळावा; खेळातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले.ताडगाव पोलीस मदत केंद्रातर्फे ताडगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन अंजली राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे सुनील कुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून ताडगावचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, कुरकुटे, कर्णवाड, पशुवैद्यकीय अधिकारी देव्हारे आदी मान्यवर उपस्थित होते.नक्षल चळवळीतील मोठ्या पदावर असलेले व्यक्ती चळवळीच्या भरवशावर कोट्यवधी रूपये कमवत आहेत. ते स्वत: शहरात राहतात. त्यांची मुले विदेशात शिकतात. सर्वसामान्य नक्षल्याला मात्र खांदावर बंदूक घेऊन जंगल फिरावे लागते. कल्लेड, गोविंदगाव यासारख्या घटनांमध्ये बंदुकधारी नक्षलवादी मारले जातात. हे आपलेच भाऊबांधव आहेत. नक्षलवादी आपल्याच लोकांमध्ये भांडणे लावून आपले हित साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.नक्षल चळवळीतील फोलपणा लक्षात आल्यानंतर या चळवळीतून अनेक नक्षलवादी बाहेर पडत आहेत. त्यांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत शासनाकडून विविध लाभ दिले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. मेळाव्याला बटेली, दुडेपल्ली, बोटनफुंडी, इरकडुम्मे, कोहकापारी, हिचानगुडा, रेला, मोर्या आदी गावातील नागरिक उपस्थित होते.मेळाव्यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, व्हॉलिबॉल, चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्या संघांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. मेळाव्याला जवळपास ४०० ते ५०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रमेश नारमवार यांनी केले.जनजागरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.