शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेसाअंतर्गत येणाºया गावांमध्ये यावर्षी बांबू उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:57 IST

पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना वनोपज विक्रीचे अधिकार मिळाले असताना यावर्षी बांबू उत्पादनात मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्देग्रामसभांकडून वर्षभरात केवळ २ लाख ५० हजार बांबूंची कापणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना वनोपज विक्रीचे अधिकार मिळाले असताना यावर्षी बांबू उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे पेसाबाहेरील क्षेत्रात मात्र बांबू उत्पादन वाढले आहे. पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी बांबू उत्पादनाचे योग्य नियोजन केले नसल्यामुळे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी ७ तालुक्यातील गावे पूर्णपणे पेसा कायद्यात येतात तर गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी व मुलचेरा या ५ तालुक्यातील काही भाग पेसाअंतर्गत येतो. पेसा कायदा लागू असलेल्या क्षेत्रात वनोपजाचे पूर्ण अधिकार ग्रामसभांना आहे.१ आॅक्टोबरपासून नवीन बांबू कटाईचा हंगाम सुरू होतो. ही कटाई जून अखेरपर्यंत सुरू असते. यावर्षी २०१६-१७ च्या हंगामात पेसा कायदा लागू असलेल्या आदिवासीबहुल गावांमधील ग्रामसभा केवळ २ लाख ५० हजार २६८ बांबू आणि २ लाख ६६ हजार ९२५ बंडलचे उत्पादन घेऊ शकल्या. त्यातून त्यांना जेमतेम ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्यावर्षी मात्र ३ लाख ८६ हजार बांबू आणि १४ लाख ४२ हजार ४९२ बंडलचे उत्पादन घेऊन ग्रामसभांनी तब्बल १४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये कमावले होते.पेसाबाहेरील क्षेत्रात वनविभाग स्वत:मार्फत बांबूची कटाई व विक्री करते. त्यांना यावर्षी जास्त बांबू उत्पादन झाले. गेल्यावर्षी वनविभागाने ७ लाख ४५ हजार ९१८ लांब बांबू आणि ९१८५ बांबू बंडल निष्कासित केले होते. यावर्षी ९ लाख ८९ हजार ९०७ लांब बांबू आणि ४४९० बांबू बंडल निष्कासित केले आहेत. वनविभागाला जमले ते पेसातील ग्रामसभांना का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामसभांना तांत्रिक माहितीचा अभावगेल्यावर्षी ४७ गावांच्या ग्रामसभांनी बांबूचे उत्पादन घेतले होते. पण यावर्षी अवघ्या १५ ग्रामसभा हे उत्पादन घेऊ शकल्या. बांबू कटाई करणाºया ठेकेदारांवर योग्य नियंत्रण नसणे, उत्पादन घेण्यासंदर्भात तांत्रिक माहिती नसणे यामुळे पेसाअंतर्गत क्षेत्रातील जंगलात बांबूची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. यातूनच यावर्षी बांबूच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसून येते.