शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बांबूचा पूल बनला त्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:48 IST

जिल्ह्याच्या निर्मितीला ३४ वर्षे लोटली तरी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विकासाची पहाट अजूनही उगवलीच नाही.

ठळक मुद्देश्रमदानातून गावकºयांकडूनच उभारणी : नाल्यावरून तात्पुरत्या रहदारीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या निर्मितीला ३४ वर्षे लोटली तरी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विकासाची पहाट अजूनही उगवलीच नाही. त्यामुळेच पुलाअभावी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलो. यावर उपाय म्हणून गावकºयांनीच श्रमदानातून बांबूचा पूल तयार करण्याचा यशस्वी प्रयोग गुंडेनूरजवळ करण्यात आला आहे.गुंडेनूरच्या नाल्यावर तयार केलेल्या १५० फूट लांब आणि ६ फूट रुंदीच्या या पुलामुळे गाववकºयांच्या भामरागड या तालुका मुख्यालयाशी तुटलेला संपर्क पुन्हा जुळला गेला आहे. बांबू, लाकूड आणि दगड या स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाºया साधनांचा उपयोग करून गावकºयांनी श्रमदानातून उभारलेल्या या पुलातून एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या समस्या आपणच सोडविण्याच्या या उपक्रमाने ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे.भामरागड या दुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यात अनेक मार्गावर चांगले रस्ते नाहीत. एवढेच नाही तर नद्यांवर पूलही नाहीत. त्यामुळे नदीपलिकडील गावकºयांना होडी, डोंग्याच्या आधारे नदी पार करावी लागते. नदीला पूर असताना तर त्या गावांचा संपर्कच तुटून जातो. या अवस्थेत वर्षानुवर्षे जीवन कंठत असलेल्या त्या गावकºयांच्या समस्या प्रशासनाने सोडविल्या नसल्यामुळे अखेर गावकºयांनीच त्यावर उपाय शोधला. लाहेरीपासून ५ किमी अंतरावरील गुंडेनूर गावाजवळून गुंडेनूर नाला वाहतो. या नाल्याचे पात्र खोल व मोठे असल्याने पावसाळ्याभर व नंतरही तो वाहात असतो. यामुळे भामरागड, लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी, तुरेमर्का, फादेवाडा, पेरमिलभट्टी आदी गावांचा संपर्क तुटतो. यामुळे शाळकरी मुलांना शाळा, बालवाडीत जाता न आल्यामुळे शिक्षणात खंड पडतो. जीवनावश्यक गरजांसोबत शासकीय योजनांपासूनही वंचित राहावे लागते. शासकीय कामे वेळेवर न झाल्यामुळे अनेकअडचणींचा सामना करावा लागतो. गुंडेनूर, इडियानाला नाल्यावर कायमस्वरूपी पक्का सिमेंट क्राँक्रिटचे पूल बांधल्या गेल्यास रहदारी आणि संपर्क तुटण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल.