शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँंकेतर्फे बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:19 IST

दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देविक्री व्यवस्था निर्माण करणार : सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते प्रा.शेषराव येलेकर, अरूण मुनघाटे, रवींद्र म्हशाखेत्री, दादाजी राऊत, हेमंत खुणे, मदन मेश्राम, व.रा.वडपल्लीवार यांना शमी व बलकोवा बांबूचे झाड देण्यात आले.याप्रसंगी गडचिरोली नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. बँकेच्या साधारण सभेसाठी उपस्थित झालेल्या जिल्ह्यातील ३०० च्या वर संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. बांबू विक्रीबाबत संबंधित कंपनीशी चर्चा करून सामजस्य करार करण्यात येईल. बांबू विक्रीची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी दिली. बलकोवा (भीमा) बांबू हा तीन वर्षात ३० फुटापर्यंत वाढतो. या बांबूची शेतकºयांनी पडिक जमीन व शेतीच्या बांधावर लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, त्यादृष्टिकोनातून जिल्हा बँक कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात आहे, असेही पोरेड्डीवार म्हणाले.दसऱ्याला पूजा, गणपतीलाही प्रियशमी झाडाचे पाने गणपतीला वाहतात. तेलंगणा राज्यात दसºयाला ही पाने पूजेसाठी उपयोगात आणतात. सुमारे ३०० वर्षापूर्वी जोधपूरचे राजे अभयसिंग यांचे प्रतिनिधी शमीच्या झाडाच्या कत्तलीसाठी गेले असता, विष्णोई समाजातील अमृतादेवी नावाच्या मुलीने शमीच्या झाडाची कत्तल करू नका, असे म्हणत झाडाला घट्ट बिलगली. परंतु राज्याच्या सैनिकांनी तिचे शिर धडावेगळे करून शमी झाडाची कत्तल करू लागले. त्यावेळी जवळपास ८४ गावातील विष्णोई समाजातील पुरूष व महिलांनी एकत्र येऊन वृक्ष तोडण्यास मनाई करू लागले. ही गोष्ट राजे अभयसिंग यांना माहित होताच ते स्वत: विष्णोई समाजाची माफी मागून शमीच्या झाडासोबतच इतरही झाडांचे संवर्धन करण्याचे वचन दिले, अशी शमी झाडाबद्दल आख्यायीका आहे, असे अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण संतुलन साधण्याचे काम विष्णोई समाजातील लोकांद्वारे करण्यात आले, असेही पोरेड्डीवार म्हणाले.

टॅग्स :bankबँक