शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुरमाड जागेवर बहरली गर्द वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र  शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे.

पुरूषाेत्तम भागडकरलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वडसा वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांच्या पुढाकारात वन विभागाने शासकीय जागेवरील  अतिक्रमण हटवून वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. ओसाड जागेवर माेठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संरक्षण व संवर्धनावर जोर दिल्याने देसाईगंज तालुक्यात वनराई बहरू लागली आहे. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र  शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे. तर एकलपूर, कसारी, पिंपळगाव (ह.), शिवराजपूर या गावांना जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/रिठ येथील वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी व भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत मिळेल.पर्यायी मिश्र रोपवनांतर्गत माती परीक्षण करून त्या जागेवर तग धरू शकणारीच विविध प्रजातींची झाडे लावण्यात आल्याने सदर जागेवर वनराई बहरविण्यात वन विभागाला यश आले आहे. यासाठी नुकतेच निवृत्त झालेले सहायक उपविभागीय वनसंरक्षक व्ही.बी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांचे स्थानांतरण झाले आहे. त्यांचे जागी येणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनीही अशीच मौलिक भूमिका बजावावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

२० हेक्टरवर आहेत २२ हजार २२० झाडेअनेकांनी अतिक्रमण केलेली २० हेक्टर शासकीय जागा वन विभागाने मोकळी केली. संपूर्ण जागा कुंपणाखाली आणून एकूण २० हेक्टर जागेत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतग॔त २२ हजार २२० वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण व संवर्धन शिवराजपूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुरू केल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष बाब अशी की यासाठी हेक्टरी १ हजार १११ रोपे लावण्यात आली. प्रत्येक रोपातील अंतर ३ बाय ३ मीटर ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे सर्वच राेपे जिवंत आहेत. मुरमाड जागेवर वृक्ष लागवड करून वनराई फुलविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे काैतुकही केले जात आहे. 

 

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग