शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिकेअभावी बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:36 IST

वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर माता घरीच प्रसुती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवजात बालकाची प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान अहेरी रूग्णालयात रविवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्देघरीच झाली प्रसूती : फोन करूनही वेळेवर रूग्णवाहिका पोहोचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर माता घरीच प्रसुती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवजात बालकाची प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान अहेरी रूग्णालयात रविवारी मृत्यू झाला.अहेरी तालुक्यातील ताटीगुडमटोला येथील रहिवासी विनोदा कृष्णा पेंदाम हिला शुक्रवारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. आशावर्कर सरीता पेंदाम हिने रूग्णवाहिकेसाठी कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मानकर यांच्याकडे संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र वेळेवर रूग्णवाहिका ताटीगुडमटोला येथे पोहोचली नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता विनोदा ही घरीच प्रसुती झाली. प्रसुतीनंतर नवजात बालकाने मातेचे दूधही प्राशन केले. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा रूग्णवाहिकेसाठी आशावर्करने संपर्क केला असता, शनिवारी सुध्दा रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती. काही वेळानंतर १०८ ची रूग्णवाहिका ताटीगुडम टोला येथे पोहोचली. नवजात शिशू व मातेला रूग्णवाहिकेत बसवून उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे भरती केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी नवजात बालकाचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे, ताटीगुडमटोला हे गाव कमलापूरपासून दोन किमी अंतरावर आहे. तरीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. रूग्णवाहिका ही २४ तास रूग्णालयासमोर उपलब्ध असणे आवश्यक असते. असे असतानाही डॉ. ज्योती डोंगरे यांनी सदर रूग्णवाहिका इतर कामासाठी वापरली. त्यामुळे वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक रूग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे तत्वावर दुसरी रूग्णवाहिका भाड्याने ठेवली आहे. मात्र ही रूग्णवाहिका डॉ. ज्योती डोंगरे यांनी नेली होती. त्यामुळे वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध करून देता आली नाही. प्रसुतीनंतर बाळ व मातेची प्रकृती तपासण्यासाठी परिचाकेला पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती बिघडल्याचे माहित झाल्यानंतर १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देऊन बाळाला व मातेला अहेरी रूग्णालयात हलविले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.- डॉ. राजेश मानकर, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, कमलापूर

टॅग्स :hospitalहॉस्पिटल