शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींसाठी बाबासाहेबांनी केला हाेता पदाचा त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विश्वगुरु होते. त्यांनी दीन, दलित, शोषित, पीडितांसाठीच नव्हे तर देश कल्याणासाठी सर्व व्यापकतने कार्य केले आहे. ओ.बी.सी.ची जनगणना होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.परंतु ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी कायदामंत्री पदाचा त्याग केला व जनआंदोलन केले. त्यांचे कार्य कुणा एकासाठी नव्हते समग्र देशासाठी होते. त्यांचे विचार आजही अंगीकारल्यास देशाचे कल्याण होईल असे प्रतिपादन आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विश्वगुरु होते. त्यांनी दीन, दलित, शोषित, पीडितांसाठीच नव्हे तर देश कल्याणासाठी सर्व व्यापकतने कार्य केले आहे. ओ.बी.सी.ची जनगणना होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.परंतु ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी कायदामंत्री पदाचा त्याग केला व जनआंदोलन केले. त्यांचे कार्य कुणा एकासाठी नव्हते समग्र देशासाठी होते. त्यांचे विचार आजही अंगीकारल्यास देशाचे कल्याण होईल असे प्रतिपादन आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे उपस्थित राहून असंख्य लोकांना मार्गदर्शन केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून दीक्षाभूमी व्यवस्थापनाच्या माध्यमातून सम्यक जागृत बौद्ध महिला समितीतर्फे पदस्पर्श दिनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. समारंभाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेसा मोटवानी, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, प्राचार्य अनिल थूल, चंदु राऊत, नंदु नरोटे, पिंकू बावणे, सुखदेव दहिवले, ए.आर.बिडवाईक, मारोती जांभुळकर, ईलियास पठाण, नरेश वासनिक, आंबेडकरी विचारवंत जीवन बागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. देसाईगंज येथील पदस्पर्श भूमी-दीक्षाभूमी ही वंचिताचे श्रद्धास्थान आहे. येथे माथा टेकवल्याने पराकोटीचे समाधान लाभते. त्यामुळे या भूमीशी माझे हृदयापासून संबंध असल्याने या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भाष्य आ. कृष्णा गजबे यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या उपाध्यक्षा शामला राऊत,संचालन डाकराम धोंगळे तर समितीच्या सहसचिव जयश्री लांजेवार यांनी केले.यशस्वीतेकरिता इंजि. विजय मेश्रामसह समितीच्या महिला व सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी कार्य केले.

चंदू राऊत यांनी केली एक महिन्याची पेन्शन दान -    दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंदु राऊत यांनी वर्षातील एक महिन्याची पेन्शन दीक्षाभूमी विकासासाठी नियमित दान देणार असल्याची घोषणा केली.यापूर्वी त्यांनी ग्रास कटर मशीन दान केल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. -    दुपारी ३.०० वाजता सर्वधर्मीय वर-वधू परिचय मेळावा व सायंकाळी सप्तखंजेरी वादक डाॅ.पवन दवंडे यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती