शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अ‍ॅक्सिस बँंकेतच राहणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:20 IST

भूमिगत गटार योजनेसाठी राज्य शासनाने दिलेला २० कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेने अ‍ॅक्सिस बँकेमध्ये जमा ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजनेचा निधी : राष्ट्रीयीकृत बँक कमी व्याज देत असल्याने निर्णय

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : भूमिगत गटार योजनेसाठी राज्य शासनाने दिलेला २० कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेने अ‍ॅक्सिस बँकेमध्ये जमा ठेवण्यात आला आहे. अ‍ॅक्सिस बँक खासगी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या बँकेएवजी सदर निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. मात्र राष्ट्रीयकृत चालू खात्यावर अत्यंत कमी व्याज देत असल्याने सदर निधी अ‍ॅक्सिस बँकेमध्येच ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेतला.गडचिरोली शहरातील शाळा, महाविद्यालये, रूग्णालये यांच्या जवळचा परिसर ध्वनीप्रदुषणमुक्त म्हणून घोषीत करण्यात येईल. या ठिकाणी तशा प्रकारचे फलक लावले जाणार आहेत. फुले वार्डातील सार्वजनिक शौचालयांकरिता सबमर्शीबल पंप बसवून व पाण्याची टाकी उभारली जाईल. याच वार्डातील कमकुवत असलेले सार्वजनिक शौचालय तोडले जाणार आहेत. संत गाडगेबाबा नगर परिषद शाळा लांझेडा येथे बोअरवेल खोदून पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याची सोय होणार आहे. शहरातील ६७ अपंग लाभार्थ्यांना तीन टक्के अपंग निधीतून मदत दिली जाणार, अशा प्रकारच्या ठरावांना नगर परिषदेच्या स्थायी समितीने परवानगी दिली.महिला कर्मचाऱ्याला ९०० रूपयांची साडीनगर परिषदतर्फे सफाई कामगारांना गणवेश पुरविले जाणार आहे. महिला सफाई कर्मचाऱ्याला ९०० रूपये किमतीची साडी खरेदी करून दिली जाणार आहे. साडीची किंमत व प्रत्यक्ष नमुना बघून काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. गणवेशाची रक्कम सफाई कर्मचाºयांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यास ते गणवेश खरेदी करीत नाही. त्याचबरोबर एकाच प्रकारचे गणवेश खरेदी करीत नाही. ही बाब समोर करून त्यांना नगर परिषदच गणवेश खरेदी करून देईल, असा निर्णय घेतला.