शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत प्रबोधन दिंडीतून युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:29 IST

धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली.

ठळक मुद्दे पृूजेचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी वैचारिक जडणघडणीसाठी युवकांनी या संमेलनाला आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन केले.पूजेच्या माध्यमातून मानसिक विकार दूर होतात. मात्र काही नागरिक पूजेचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करतात. अशा भोंदंपासून सावध राहावे, असे आवाहन गडचिरोली येथील महिला महाविद्यालयात बोलताना रक्षक यांनी केले. रविवार दि.२८ जानेवारी रोजी मेंढा-लेखा येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाला युवा विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिकाधिक राहावी, या उद्देशाने ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ या उपक्रमांतर्गत या जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला डॉ.शिवनाथ कुंभारे, डॉ.सतीश गोगुलवार, पंडित पुडके, प्राचार्य डॉ.सुरेश खंगार, डॉ.काकड, रवी मानव आदी गुरूदेव सेवक उपस्थित होते.प्रार्थनेच्या माध्यमातून आपण देवासोबत कमिटमेंट करतो, त्यामुळे भक्तीपेक्षा प्रार्थनेला ग्रामगीतेत अधिक महत्त्व देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयातील आजचे विद्यार्थी भावी भारताचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ सक्षम, प्रामाणिक, निर्व्यसनी, सुशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनात अधिकाधिक युवकांची उपस्थिती राहावी यादृष्टीने प्रयत्न आहेत, असे रक्षक म्हणाले.मेंढा-लेखा येथील कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गावगणराज्य साहित्य नगरीत रविवार दि.२८ ला सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद) चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी १२ ते ४ दरम्यान दोन परिसंवाद, दुपारी ४ ते ५ दरम्यान देवाजी तोफा आणि भास्कर पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत आणि सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज