गडचिरोली : तालुक्यातील बोदली येथे महाराष्ट्र अंनिस तर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रात्यक्षिक सादर करून मनोरंजनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे हाेते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, काेषाध्यक्ष विठ्ठल कोठारे, प्रशांत नैताम, गोविंदराव ब्राम्हणवाडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य आकाश निकोडे, डॉ. विलास कुमरे, वासुदेव दिंडे, मेंगाजी कोडापे आदी उपस्थित होते. चमत्कार सादरीकरण सोबतच सापाविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यात आले. हिस्टेरीया, सिझोफेनिया सारखे आजार झालेल्या व्यक्तीचे बोलणे असबंद्ध असतात व काही वेळात नार्मल व्यक्तीसारखे वागू लागतात आणि आपण असे काही केलेच नाही किंवा मला काहीच आठवत नाही असे सांगून इतरांना गोंधळवून टाकतात. खास करून १५ ते ४५ च्या वयोगटातील स्त्रिया या आजाराला बळी पडतात. अशांना भूतबाधा झाल्याचे सांगून काही मांत्रिक त्यांचे लैंगिक शोषण करतात. तर काहीची आर्थिक लूट हाेते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार सुरू ठेवणे हाच पर्याय असतो, असे मार्गदर्शन करण्यात आले. संचालन राजेंद्र कोडापे तर आभार दिवाकर पिपरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर पिपरे, गुरूदास ढोले, चंद्रकांत निकोडे, निमेश मेश्राम, शर्मानंद, शाम निकोडे, सूरज मोहुर्ले, अजय निकोडे, पांडुरंग गेडाम, तारा कोडाप, जीजा गेडाम, यशोधरा पंधरे, सपना मडावी, बहिणाबाई मेश्राम, क्षीरसागर कोडाप यांनी सहकार्य केले.