शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याबाबत जागृतीची गरज

By admin | Updated: August 1, 2015 01:14 IST

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन : हेमलकसा येथे प्रचार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजुनही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. शासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. असे झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचेही आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात माता व बाल आरोग्य अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य (लसीकरण) अभियान निमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे सहायक निर्देशक प्रभावती आकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा प्रभावती आकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रसंशनीय असल्याचे प्रतिपादन केले. बालकाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बालकाची काळजी कशा पध्दतीने घेण्यात यावी, बालकांना होणारे विविध प्रकारचे आजार यावरसुध्दा प्रकाश टाकला. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा प्रदेश सहायक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)