शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट जागृतीसाठी जिल्ह्यात ३७ पथके सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:17 IST

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे मुद्रित पावतीची सुविधा असणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असल्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरात त्याचे प्रात्याक्षिक दाखविणे सुरू झाले. त्यासाठी ३७ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतयारी लोकसभेची : तीनही विधानसभा मतदारसंघात देणार नवीन तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे मुद्रित पावतीची सुविधा असणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असल्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरात त्याचे प्रात्याक्षिक दाखविणे सुरू झाले. त्यासाठी ३७ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांमध्ये एकतर्फी निकाल लागले. त्यामुळे मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान यंत्र न वापरता जुन्या पद्धतीने मतपत्रिकेतूनच मतदान घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा पर्याय समोर आला आहे.बंगलोरमध्ये तयार झालेल्या या नवीन यंत्रात मतदाराने कोणाला मत दिले याची छापिल पावली तयार होणार आहे. ती पावती मतदाराला मशिनमध्ये दिसून नंतर मतपेटीत बंदीस्त होईल. मतमोजणीच्या वेळी मतदान यंत्राच्या निकालावर एखाद्या उमेदवाराने आक्षेप घेतल्यास मतपेटीत बंदीस्त असलेल्या मतदारांच्या पावत्या तपासून मतमोजणी केली जाईल. या प्रक्रियेत मतमोजणीला वेळ लागण्याची शक्यता असली तरी मतदान यंत्रावरील विश्वासार्हतेची पडताळणी त्यातून करणे शक्य होणार आहे. जनजागृती कार्यक्रमांतर्गत माध्यम प्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, शासकीय वसाहती, पोलीस ठाणे, बँक मुख्यालय, बाजाराचे ठिकाण अशा ठिकाणी स्वतंत्र कार्यक्रम तयार करून राबविला जाणार आहे.७४९ गावांना भेट देणारएव्हीएम (मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट यांची कार्यपद्धती मतदारांना योग्यरित्या समजावून सांगण्यासाठी नियुक्त केलेली ३७ पथके जिल्ह्यातील ७४९ गावांमध्ये जाऊन जागृती करणार आहेत. त्यासाठी त्यांना ११ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.सर्वाधिक गावे गडचिरोली मतदारसंघातआरमोरी विधानसभा मतदार संघातील १९५ गावांसाठी १० पथके पथके असून ती २४ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत फिरणार आहेत. गडचिरोली मतदार संघात २७८ गावांसाठी १२ पथके असून ती ३० जानेवारीपर्यंत जनजागृती करतील. तर अहेरी मतदार संघात २७६ गावांसाठी १४ पथके असून ती ११ जानेवारीपर्यंत ठिकठिकाणी फिरणार आहेत. याशिवाय एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात राहून जनजागृती करणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील.