शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरण रखडले

By admin | Updated: July 1, 2014 01:27 IST

देशातील अतिमागास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात जिल्हा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्ताव धूळ खात : गडचिरोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी होणार होती स्थापनागडचिरोली : देशातील अतिमागास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात जिल्हा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून तसेच गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या माध्यमातून तज्ज्ञांनी तयार केलेला विकास प्राधिकरणाचा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र बराच कालावधी होऊनही राज्य शासनाने जिल्हा विकास प्राधिकरण स्थापण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अधिवेशनात केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे. २०१० नंतर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. या निधीचा योग्य विनियोग व्हावा, अनेक योजनांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च व्हावा, या दृष्टीकोनातून जिल्हा विकास प्राधिकरण स्थापण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी या प्राधिकरणाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला. या आराखड्यात अधिकाऱ्यांचेच वर्चस्व ठेवण्यात आले होते. या बाबीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. काही काळ हा प्रस्ताव प्रलंबितच राहिला. दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गडचिरोली व गोंदियासाठी प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली व प्रशासन प्राधिकरणाची रचना कशी राहिल. याचा आराखडा तयार करण्याच्या कामाला लागले. दरम्यान गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही पुढाकार घेऊन प्राधिकरणाच्या स्थापणेबाबत गडचिरोली येथे एक चर्चासत्र घडवून आणले व तज्ज्ञ तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यांच्या आलेल्या सूचना शासनाला प्रस्ताव स्वरूपात पाठविण्यात आल्या. यात काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ३० सप्टेंबर रोजी नागपूर येथे तज्ज्ञांची एक बैठकसुध्दा घेण्यात आली. या बैठकीतूनसुध्दा आराखड्याचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले. प्रशासनानेही एक प्रस्ताव शासनाला दिला. मात्र प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण राहिल, यावरून दोन काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला व जिल्हा विकास प्राधिकरण रखडले. शासनानेही यावर कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: घोषणा करूनही या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर राज्य शासन उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)