शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आस्ट्रेलिया देणार आरोग्य प्रशिक्षण

By admin | Updated: August 1, 2016 01:21 IST

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याच्या समस्या अनेक आहेत.

हेल्थ करिअर फॉऊन्डेशनचा पुढाकार : आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पाऊल गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याच्या समस्या अनेक आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना हेल्थ केअर फॉउंडेशन आस्ट्रेलियाच्या तज्ज्ञामार्फत प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या दृष्टीकोणातून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात या बाबतचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंगम माळी यांच्या पुढाकारातुन नुकतेच हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया या संस्थेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पेरीस श्रॉफ व जिल्हा प्रशिक्षण पथक गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी आरोग्य विषयक बाबीवर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याशी चर्चा केली. त्यात हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया या संस्थेतील तज्ज्ञ मंडळीचा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेकरीता कसा फायदा करुन घ्यायचा तसेच जिल्ह्यातील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया येथील तज्ज्ञांच्यामार्फत प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक पाऊल उचलल्या गेले आहे. हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया ही एक नामांकित संस्था असुन अपोलो ग्रुप आॅफ हॉस्पीटल तसेच दक्षिण भारतातील वेगवेगळया नामांकित रुग्णालयांशी व महाराष्ट्र परिचर्या परिषदेशी संलग्न आहे. सदर संस्थेव्दारे जिल्ह्यातील नोंदणीकृत नर्सेसना विशेष लाईफ सपोर्ट तसेच अन्य प्रकारचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचा फायदा जनतेला निश्चितच होईल. गडचिरोली सारखा अतिदुर्गम, नक्षल प्रभावीत व अतिसंवेदनशील जिल्हा निवडून समाजाप्रती त्यांच काही देण लागतं याची प्रचीतीच त्यांनी करुन दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे सकारात्मक चर्चा होऊन आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे आलेले आहे. सदर चमुत हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलियाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पेरीस श्राफ, समन्वयक ढोले, सईद जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे हजर होते. (जिल्हा प्रतिनिधी)