गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ मार्च रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. संगणक परीक्षेला डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ द्यावी, २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करू नये, शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा करावी, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना विशेष वेतनवाढ देण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीज व पाण्याचा मोफत पुरवठा करावा, आरटीईनुसार जिल्हा परिषद शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्यात यावा, पटसंख्येची मर्यादा न ठेवता, पहिले ते सातवीच्या शाळांना मुख्याध्यापक द्यावेत, सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा पुरवठा करावा, मुख्यालयी राहण्याची अट शिथील करावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबवावी, प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, आरटीईमधील त्रुट्या दूर कराव्या, आंतर जिल्हा बदलीचे राज्यस्तरीय रोष्टर तयार करावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल मुलकलवार, राज्य प्रतिनिधी माया दिवठे, अमरसिंह गेडाम, योगेश ढोरे, अध्यक्ष धनपाल मिसार, कार्याध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, रमेश रामटेके, लालचंद धाबेकर, विभाग प्रमुख मेघराज बुराडे, रवींद्र वासेकर, नानाजी जक्कोजवार, अरूण पुण्यप्रेड्डीवार, राकेश सोनटक्के, गुलाब मने, प्रभाकर गडपायले, दिगंबर करंबे, श्रीनिवास जक्कोजवार, दिलीप नैताम, मुबारक सय्यद, रोशनी राखडे, सिंधू उघाडे, लक्ष्मी गडपल्लीवार, अरविंद टेंभूरकर, नरेश चौधरी, जयंत राऊत, सुनील चरडुके, रवींद्र मुलकलवार, खिरेंद्र बांबोळे, रामभाऊ कोकोडे, डंबाजी पेंदाम, उत्तम मिस्त्री आदींनी केले.आंदोलनाला जिल्हाभरातील शेकडो शिक्षक उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)
शिक्षकांचे लक्षवेधी धरणे आंदोलन
By admin | Updated: March 8, 2015 00:52 IST