शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:40 IST

निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कमलापूर परिसरात पर्यटनाला वाव असून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : कमलापूर हत्ती कॅम्पला भेट

आॅनलाईन लोकमतकमलापूर : निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कमलापूर परिसरात पर्यटनाला वाव असून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.जिल्हाधिकारी अहेरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी शुक्रवारी कमलापूरला आकस्मिक भेट दिली. तब्बल ४५ मिनिटे थांबून स्थानिक युवक व गावकरी यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी आले असल्याची माहिती युवकांना कळताच युवकांनी हत्ती कॅम्पकडे धाव घेतली. यादरम्यान हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळ घोषीत करावे, तलावाचे खोलीकरण करावे, पाटांची दुरूस्ती करावी, कमलापूर येथील गुरूदेव आश्रमशाळा शासकीय करण्यात यावी, आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केल्या.कमलापूर येथील हत्ती कॅम्प संपूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. हत्तींच्या पालन पोषणासाठी या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी व चारा उपलब्ध आहे. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने हत्ती कॅम्पचा विकास केल्यास या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढण्यास वाव आहे. मात्र वन विभाग येथील हत्तींना दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही अत्यंत चुकीची बाब आहे. हत्ती स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न झाल्यास कमलापूरसह परिसरातील नागरिक आंदोलन करतील. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. कमलापूर परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाला चांगला वाव आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचेही आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल व इतर विभागाचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते.विकासाला गती मिळेलकमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. त्याचबरोबर येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटक व नागरिकांना नेहमीच आकर्षीत करते. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून या भागाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा येथील जनता बाळगूण आहे.