शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

महिला रूग्णालयासमोरील जागा बळकाविण्याचे व्यावसायिकांचे प्रयत्न

By admin | Updated: December 6, 2014 22:48 IST

स्थानिक इंदिरा गांधी चौकात १०० खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षक भींतीच्या समोर अतिक्रमण करून जागा

गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकात १०० खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षक भींतीच्या समोर अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी सुरू केला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयावर संपूर्ण जिल्ह्यातील रूग्णांचा भार आहे. या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने स्थानिक इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रूग्णालयाचे बांधकामाला मंजुरी दिली. सदर रूग्णालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. महिला रूग्णालय शहराच्या मध्यभागी आहे. जिल्ह्याच्या इतर ठिकाणावरून येणारी चारही मुख्य रस्ते इंदिरा गांधी चौकात येऊन मिळतात. त्यामुळे या चौकात नेहमीच गर्दी राहत असल्याने चौकात अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. काही दिवसातच महिला रूग्णालयसुध्दा सुरू होईल. या ठिकाणी येणारे रूग्ण व त्यांचे नातेवाईक यामुळे गर्दीत आणखी भर पडणार आहे. परिणामी या परिसरात खर्रा, चहा व इतर वस्तुंची विक्री मोठ्या प्रमाणात होईल. हा अंदाज लक्षात घेऊन संरक्षक भींतीला लागूनच व्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा बळकाविणे सुरू केले आहे. याच ठिकाणी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसचा थांबा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचीही गर्दी राहते. अतिक्रमणामुळे या ठिकाणी अपघात होण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)